बारामती : कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम बारामती येथे व्हाईट लेदर बॉल वरील “कारभारी प्रिमिअर लिग २०२५” चे आयोजन दिनांक २४ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.
क्रिकेटच्या प्रचार व प्रसाराच्या उद्देशाने व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या खेळास मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टी मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, जळगांव, सातारा, बारामती येथील India U-19, IPL, MPL, रणजीपट्टू तसेच महाराष्ट्र संघातील अनेक नामांकीत खेळाडूंचा भरणा असलेले एकुण १२ संघ सहभाग घेणार असून त्यांची प्रत्येकी तीन प्रमाणे चार गटांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटामधुन दोन संघ बाद फेरीसाठी पात्र होतील व त्यानंतर चार क्वॉर्टर फायनल, दोन सेमी फायनल व फायनल मॅच याप्रमाणे “कारभारी प्रिमिअर लिग २०२५” T-20 क्रिकेट स्पर्धेची रूपरेषा असणार आहे.
सदरची स्पर्धा ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नियमांस अधिन राहून खेळविली जाणार असून प्रथम बक्षिस रू. २.०० लाख व चषक, द्वितीय बक्षिस रू. १ लाख व चषक, प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच अशा एक ना अनेक सुविधा, भरघोस वैयक्तीक बक्षिसे रोख रक्कम व चषक, खेळाडूंकरिता ब्रँडेड कलर ड्रेस, हायड्रेशन/मेडीकल सपोर्ट, उत्तम राहण्याची मोफत व्यवस्था, हॉटेल ते स्टेडीयम पिकअप ड्रॉप सुविधा, भरघोस वैयक्तीक रोख बक्षिसे, खेळाडूंचा इन्शुरन्स, एनर्जी ड्रिंक, फ्रूट बास्केटसह यु-ट्युब लाईव्ह प्रक्षेपनाद्वारे जगभर प्रसिध्द होण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे.
सदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक २४ जानेवारी२०२५ रोजी सकाळी ९ वा. हनुमंतराव पाटील , वैभव नावडकर गणेश शिंदे , सुदर्शन राठोड , बापूराव दडस , किशोर भापकर , विलास नाळे , वैशाली पाटील या व अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी व व्हाईट बॉल वरील सामन्यांचा थरार पाहण्याचा लाभ बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमींनी घ्यावा असे आवाहन कारभारी प्रिमियर लिगचे चेअरमन प्रशांत (नाना) सातव यांनी सर्व बारामतीकरांना केले.