महाजनादेश यात्रेदरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धरपकड चालू

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे. यामुळे बारामतीला छावणीचे स्वरुप आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची सभा 1 वाजता सुरू होणार होती. परंतु, अद्यापही मुख्यमंत्री आलेले नाही.

बारामती शहरात एमआयडीसी परिसरात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे. या कार्यकर्त्यांना बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.