बारामती- अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या घराबाहेर पारधी समाजाच्या लोकांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.सोनगावमध्ये बारामती पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात कारवाई केली. त्यावेळी दारू विक्रेता मंगलेश भोसले हा पळून गेला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने नीरा नदीत उडी मारली. पोहताना त्याला दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी समोर ठिय्या मारला.
यावेळी सोनगावमध्ये जे पोलीस कारवाईसाठी आले होते. त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा, अशी समाजाच्या लोकांची मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सहयोग सोसायटी निवस्थानासमोर नातेवाईक ठाण मांडून बसले.