बारामती : मनोहर भोसलेला आणखीन तीन दिवसाची पोलीस कोठडी

बारामती :  संत श्री. बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दि. 10 सप्टेंबरपासून पोलीस कोठडीत असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलीस कोठडीत बारामती न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली. 11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.

दरम्यान, न्यायालयाने मनोहर मामा भोसले याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आणि ती आज रोजी गुरुवारी संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे हजर करण्यात आले होते.

मागील वेळी प्रमाणे आजही मनोहर भोसले याच्या भक्तानी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले तर सरकार पक्षाकडून ॲड. एन.पी. कुचेकर यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.