बारामती( प्रतिनिधी) : ढेकळवाडी तालुका बारामती येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. वार्ड क्रमांक चार मधून शुभम ठोंबरे यांचा यामध्ये समावेश आहे. सहा जागांसाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत ढेकळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अकरा जागेसाठी निवडणूक होत असून त्यापैकी पाच जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून दिले आहेत. 34 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी वीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहा जागांसाठी निवडणूक लागली.
वार्ड क्रमांक चार मध्ये शुभम प्रताप ठोंबरे, लक्ष्मी बाळासाहेब बोरकर व सुनीता संजय टकले हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर वार्ड क्रमांक 2 मधून हर्षल बाळासाहेब चोपडे व वार्ड क्रमांक 3 मधून मंगल सुभाष ठोंबरे हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
बिनविरोध उमेदवारांची फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली तसेच गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.