बारामतीत ‘आशा’कडून 66 शालाबाह्य मुले शाळेत दाखल

बारामती – बारामती तालुक्‍यात एका महिन्यात 66 शालाबाह्य मुले सापडली असून त्यांना स्थलांतरित व शालाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या “आशा’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी शाळेत दाखल केले असल्याची माहिती आशा प्रकल्प प्रमुख संतोष शेंडकर यांनी दिली.

बारामती पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक व पंचायतीच्या अधिकाऱ्यांची बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांची बैठक पार पडली, त्यावेळी शेंडकर यांनी माहिती दिली. यावेळी प्रभारी गटशिक्षण अधिकारी संजय जाधव, अनिल चाचर, आकाश सावळकर, हेमंत गायकवाड उपस्थित होते.

काळे म्हणाले की, शिक्षण हक्‍क कायद्यातील कलम 9 अन्वये स्थनिक स्वराज्य संस्थेची शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार बारामती तालुका शाळाबाह्यमुक्‍त करण्याच्या दृष्टीने शिक्षकांबरोबरच ग्रामपंचायतीनी हद्दीतील स्थलांतरित व शाळाबाह्य मुले शोधणे व शाळेत टिकण्यासाठी मदत करावी. बालमजुरी करणारी मुले असतील तर ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिस बजावावी, असे आदेश त्यांनी दिले. चौदाव्या वित्त आयोगातून साहित्यांसाठी मदत करावी, असे आवाहन काळे यांनी केले.

आशा प्रकल्पाने शोधून दाखल केलेल्या 66 मुलांना आमचे शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देतील यासाठी पाठपुरावा करू. तसेच कारखाना हंगाम काळात वरिष्ठ पातळीवर बोलून मुलांच्या संख्येनुसार शिक्षक उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना पुस्तके, पोषण आहार उपलब्ध करून देऊ
– संजय जाधव, प्रभारी गटशिक्षण अधिकरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)