धक्कादायक! कोयत्याने वार करून वडिलांनी केली सावत्र मुलाची हत्या; बारामती तालुक्यातील घटना

बारामती – आई वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची कातकरीचे काम करणाऱ्या वडिलानेच लाकडं तोडण्यासाठीच्या कोयत्याने मानेवर वार करून हत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील शिपकुले वस्तीवर घडली आहे.

कोयत्याचा घाव जोरात बसल्याने मुलाचा यात जागीच मृत्यू झाला आहे. गोपीनाथ मारुती जाधव ( वय वर्षे 18 )असे मयताचे नाव आहे.  मारुती जाधव ( वय 45 ) असे आरोपीचे नाव असून त्याला बारामती तालुका पोलिसांनी एक तासाच्या आत अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.