बारामती (प्रतिनिधी) : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अनिल बबन बनकर ( वय ३८,रा. टिळेकर वस्ती, पिलानवाडी, ता. दौंड,) यांस जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिलानवाडी,( ता. दौंड ) येथे १८ जून २०२० रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिडीतेची आई व कुटूबिंय पोल्ट्रीवर कामास होते. त्यावेळेस पिडीता ६ वर्षांची होती. घटना घडतेवेळी पिडीतेची आई भाजीपाला आणण्यासाठी राहू येथे गेली होती. त्यावेळेस पिडीता व तिचे भाउ बहीण पोल्ट्रीजवळ खेळत होते. त्यावेळेस आरोपी तेथे आला. त्याने पिडीतेच्या बहीणीला बाहेर जाण्यास सांगून पिडीतेला पोल्ट्रीत घेवून गेला व पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला व आई वडीलांना जर ही गोष्ट सांगितली तर तिला पोटात चाकू मारण्याची धमकी देवून निघून गेला. अशी फिर्याद पिडीतेच्या आईने यवत पोलीस स्टेशन येथे केली होती.
सदर प्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी केला व आरोपी विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (४,६,१०,१२ व भा.द.वि. कलम ३७६,५०४,५०६) प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी न्यायालयीन बंदी होता. सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी म्हणजेच पिडीतेची आई ही न्यायालयात फितूर झाली होती व फिर्यादीच्या विसंगत जबाब न्यायालयात दिला. परंतू पिडीता ही ७ वर्षांची असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. तसेच सदर खटल्यामध्ये डॉ. शशिकला एम. यांचा न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला.. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज व त्यांनी धरुन न्यायालयाने आरोपी अनिल बनकर यांस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ प्रमाणे जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम १० प्रमाणे सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व कलम १२ प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील दहा हजार रुपयांची रक्क्म पिडीतेला देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना यवत ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार पोलीस नाईक वेनुनाद तुकाराम ढोपरे व न्यायालयीन कोर्ट पैरवी एन.ए. नलवडे यांनी सहकार्य केले.
विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले व त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अनिल बनकर यांस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ प्रमाणे जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम १० प्रमाणे सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व कलम १२ प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील दहा हजार रुपयांची रक्क्म पिडीतेला देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना यवत ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार पोलीस नाईक वेनुनाद तुकाराम ढोपरे व न्यायालयीन कोर्ट पैरवी एन.ए. नलवडे यांनी सहकार्य केले.