बारामती- बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 81 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आजपासून बारामतीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या सात दिवसात बारामतीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीत एकूण घेतलेल्या rt-pcr 218 पैकी 24 व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. 68 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.121 अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.तसेच इतर तालुक्यातील 2 पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय एंटीजेन 63 नमुने घेतले. त्यापैकी 16 पॉझिटिव्ह आले.47 निगेटिव्ह आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत 124 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 41 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 83 नमुने निगेटिव्ह आले आहेत. शहरात 38 तर ग्रामीण भागात 43 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.