बारामती : येथील सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय बारामती याठिकाणी उपचाराकरिता कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्यातच उन्हाचा पारा देखील दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांना रखरखत्या उन्हात बसावे लागते होते व काही जणांना रात्र उगढ्यावर काढावी लागत होती.
ही बाब लक्षात घेता सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या समोरील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या उपचाराची व्यवस्था होईपर्यंत, त्यांना आराम मिळावा डॉ. सदानंद काळे व प्रांत अधिकारी कांबळे यांच्याशी चर्चा करून याकरीता मंडप टाकून साठ बेड टाकण्यात आलेले आहेत.
यामध्ये रुग्णांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पॉझिटिव रुग्णांत सोबत येणाऱ्या नातेवाईकांची देखील याठिकाणी स्वतंत्र्य कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही तातडीची व्यवस्था करणे कामी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव ,नगरसेवक बिरजु मांढरे ,सुधीर पानसरे अभिजित चव्हाण, अमर महाडिक ,नटराजचे सदस्य यांनी परिश्रम घेतले ,अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.