बारामती रुग्णालयांवर भरारी पथकाची नजर

बारामती – उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील,तालुक वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांच्या पथकाने अचानक पणे Covid रुग्णांना सेवा देणाऱ्या बारामती हॉस्पिटल ला भेट दिली. 2 दिवसांपूर्वी जगन्नाथ हॉस्पिटल व देशपांडे हॉस्पिटल यांना भेटी देण्यात आल्या होत्या.

सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा, उपचार पद्धती, हॉस्पिटलमध्ये असणारे बेड, ऑक्सिजन-व्हेंटिलेटर ,रेमडीसिवर इंजेक्शन ची मागणी-पुरवठा, टास्क फोर्स ने दिलेली नियमावली, रुग्णाचे होणारे बिल या सर्व गोष्टी चे पालन होत आहे का याबाबत तपासणी केली त्यावरून रुग्णांना चांगली सुविधा देण्यात येत असल्याचे दिसून आले.रुग्णांच्या नातेवाईकाकडे हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा बाबत चर्चा केली असता त्यांनी समाधान व्यक्त केले परंतु रुग्णांच्या काळजीने तणावात असल्याचे दिसले त्यानां ही परिस्थिती निघून जाईल सर्व काही ठीक होईल असा विश्वास दिला.

डॉक्टर, नर्सेस, स्टाफ यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर असणाऱ्या अतिरिक्त ताणाबाबत ऐकून घेऊन ते करत असलेले श्रेष्ठ असून अजून काही दिवस आपणाला अशीच चांगली सेवा द्यायची आहे.आपले काम अतिशय उत्तम असून त्याचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

काही किरकोळ स्वरूपात कागदोपत्री पाठवण्यात येणारी माहिती याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अजून जास्तीत जास्त कोविड रुग्णांना सेवा पुरवनाऱ्या हॉस्पिटलला अचानक भेटी देऊन तपासण्या करण्यात येणार आहेत.यामध्ये हलगर्जीपणा करणारे,रुग्णांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.