डोर्लेवाडी(प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे आज दुपारी ऊसाला अचानक आग लागली. आगीत ११ एकर ऊस जळून खाक झाला.
दुपारी वाऱ्याचा जोर असल्याने या आगीत तब्बल ११ एकर ऊस जळाला. आग आटोक्यात आणण्यासाठी तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. छत्रपती कारखान्याच्या अग्निशमनने आग विझवली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या आगीत पाच एकरमधील ठिबक सिचनही जळाले असून आगीत एकूण पाच शेतकऱ्यांचे मिळून जवळपास चौदा लाखाचे नुकसान झाले आहे. ऊसाला आग लागण्याची ही झारगडवाडीतील दुसरी आणि बारामती तालुक्यातील तिसरी घटना आहे. यामुळे ऊस लागत असलेल्या आगीमुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.