माळेगाव (प्रतिनिधी) – माळेगाव (ता. बारामती) येथील 37 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. माळेगाव येथील कोरोना संक्रमित रुग्ण पुणे येथून सहा दिवसांपूर्वी माळेगाव येथे आला होता. त्याला घशाचा त्रास होऊ लागल्याने शहरातील शासकीय सिल्वर जुबली रुग्णालयातून त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये तो करून संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले.
माळेगाव येथील हा दुसरा कोरोनासंक्रमित रुग्ण आहे. तर ग्रामीण भागातील तिसरा रुग्ण ठरला आहे. दरम्यान, मालेगाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक नियंत्रित करण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे.
पुणे-मुंबई येथील नागरिक बारामतीत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाचा धोका वाढला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच घराबाहेर पडू नये असे अवाहन प्रांताधिकारी यांनी केले आहे