बारामती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका कार्यकर्त्याने आपल्या शरीरावर शरद पवार यांचा चेहरा असलेला टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू त्याने पर्मनंट काढून घेतला आहे. अक्षय साळवे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी असलेल्या अक्षयने पवार यांच्या प्रेमापोटी अक्षयने आपल्या संपूर्ण पाठीवर त्यांचा टॅटू काढला आहे. टॅटू पाहून खुद्द पवारांनीही त्याचे कौतुक केले आहे. संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला आहे.
पावसात भिजत शरद पवारांनी साताऱ्यामध्ये प्रचार सभा घेतली होती. हे दृश्य पाहून अक्षयही भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.
दरम्यान, आपल्या पाठीवरील ही कारागिरी खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची काल भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अक्षयने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले.