बारामती ( प्रतिनिधी ) तालुक्यातील गोजुबावी येथे एकास कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे .त्यामुळे बारामतीतील कोरोना संक्रमितंची संख्या 26 वर पोहोचली आहे.
गोजुबवी येथे आढळून आलेला कोरोना संक्रमित रुग्ण दौंड येथे राहतो. त्याचे आई-वडील गोजुबवी येथे वास्तव्यास आहेत. 22 जून रोजी तो आई वडीलांना भेटण्यासाठी गोजुबवी येथे आला होता. त्यानंतर त्याला सर्दी खोकला तसेच घशाचा त्रास होऊ लागला .त्याच्या घशातील स्त्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
तपासणी अहवालात तो कोरोना संक्रमित आसल्यचे आढळून आले. त्याच्यावर रुई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत . तालुक्यातील मोडवे येथे मुंबईहून आलेल्या दोन मुली कोरणा पॉझिटिव सापडल्यानंतर भोजगाव येथे हा रुग्ण आढळून आला आहे.