बारामती : बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. बारामतीत एकूण रुग्णांची संख्या 267 झाली आहे.पणदरे येथील एका कोरोनाग्रस्तचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या १८ वर पोहचली आहे.
दि (9) रोजी 82 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 22 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त झालेल्या अहवालात पैकी बारामती शहरातील 8 व ग्रामीण भागातील 4 असे 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत . बारामतीची एकूण रुग्ण संख्या 267 झालेली आहे.
तसेच काल रात्री तसेच पंधरे येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या 18 झाली आहे. बारामतीतील ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शिरसुफळ येथील 2 व वंजारवाडी येथील 1 आणि धुमाळवाडी येथील 1 एका रुग्णाचा समावेश आहे.