मुळशीतुन एनडीआरएफची टीम रवाना
डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी हद्दीत असलेल्या कऱ्हा नदीत 19 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. हर्षद सोमनाथ चांदगुडे असे नदीत वाहून गेलेल्या युवकांचे नांव आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता शेतातील काम करून घरी जात असताना कऱ्हा नदी पात्रात हात पाय धुण्यासाठी गेला असता तो कऱ्हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. 24 तास होऊनदेखील अद्याप हर्षदचा शोध लागलेला नाही. मुळशी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनची टीम शोध घेण्यासाठी रवाना झाली आहे.
बारामतीसह पुरंदर तालुक्यातील कर्हा नदी पात्रात सध्या पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीच्या परिसरात कुणीही जाऊ नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. याच नदीच्या पात्रालगत असलेल्या शेतात काल सकाळी हा तरुण काम करत होता. शेतातील काम आटपून घरी जाण्यासाठी नदीच्या पात्रात जाऊन पाय धुण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या सांगितले आहे. शिवाजी तावरे (प्रत्यक्षदर्शी )
सध्या संपूर्ण नदी दुथडी पाण्याने भरून वाहत असल्यामुळे पाण्याचा प्रचंड वेग आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे हर्षदचा शोध घेणे जिकिरीचे झाले आहे. आज सकाळी हा खाजगी टीम कडून शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले आहे. आता महसूल प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागातील मुळशी या ठिकाणाहून एक विशेष पथक शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
– भरत खैरे ( जिल्हा परिषद सदस्य )