Barabanki accident । उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात झाला. एक मिनी बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या बसला जाऊन धडकली. ज्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. ही मिनी बस महाराष्ट्रातून अयोध्येला भाविकांना घेऊन जात होती, असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकीच्या लोणी कटरा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पूर्वांचल एक्सप्रेसवे २१/७ वर हा अपघात झाला. ज्याठिकणी एक हाय स्पीड मिनी बस नियंत्रणाबाहेर गेली आणि बिघडलेल्या बसला धडकली. मिनी बसमध्ये १८ जण होते. सर्वजण महाराष्ट्रातून अयोध्येला जात होते.
जखमी सीएचसीमध्ये दाखल Barabanki accident ।
हा अपघात इतका भीषण होता की चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जखमींना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताबाबत बाराबंकीचे एसपी दिनेश सिंह यांनी, “रविवारी सकाळी पूर्वांचल एक्सप्रेसवेवर एक दुःखद अपघात झाला. ज्यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या मिनी बसमध्ये १८ जण होते.” अशी माहिती दिली.
सध्या मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की मिनी बसमधील लोक ओरडू लागले.
मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावरही भीषण अपघात Barabanki accident ।
शनिवारी प्रयागराजमध्येही एक मोठा अपघात झाला. जिथे मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर बोलेरो आणि बसची टक्कर झाली. ज्यामुळे बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या १० जणांचा मृत्यू झाला. बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील होते. जे महाकुंभात स्नान करून परतत होते. त्याच वेळी, बसमध्ये प्रवास करणारे सर्व लोक मध्य प्रदेशातील राजगडचे होते, जे महाकुंभात स्नान करण्यासाठी जात होते. या अपघातात बसमधील १९ जण जखमी झाले.