वकिलांसाठी बार कौन्सिलची विमा योजना

करोना, पॅडेमिक आजार, अपघात आणि इतर आजार होणार कवर : विमा काढण्याची ऑनलाईन प्रक्रीया

पुणे : बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने दोन्ही राज्यातील वकिलांसाठी विमा योजना सुरू केली आहे. यामध्ये करोना, सर्व पॅडेमिक आणि पहिल्या दिवसापासूनचे सर्व आजार कवर होणार आहेत. 1 ते 10 लाखाचे सुरक्षा कवच या योजनेत वकिलांना मिळणार आहे. 6 जुलैपर्यंत वकिलांना ही योजना घेता येणार असल्याची माहिती बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आणि इन्शुरन्स कमिटीचे चेअरमन ऍड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची पर्सनल एक्‍सीडेंट अणि मेडिक्‍लेम इन्शुरन्स (ग्रुप) योजनेची मुदत 7 जुलै 2020 ते 6 जुलै 2021 असणार आहे. सत्तर वर्षापर्यंतच्या वकिलांना याचा लाभ घेता येणार आहे. 

विम्याचा हप्ता वय आणि वकील घेत असलेली इन्शुरन्सच्या रक्कमेवर अवलंबून आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पॉलिसी काढता येणार असून, पैसे भरण्याची ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही वैद्यकीय तपासाची गरज नाही. पती-पत्नी अणि पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन मुलांचा यात समावेश आहे.

या पॉलिसीची नोटीस आणि लीफलेट बार कौन्सिलच्या www.barcouncilmahgoa.org संकेतस्थळावर आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी असलेली लिंक :apps.barcouncilmahgoa.org देखील उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.