पुणे, – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे ४ हजार ७१० एवढ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. पठारे यांना एकूण १ लाख ३३ हजार ६८९, तर राष्ट्र्वादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांना १ लाख २८ हजार ९७९ मते मिळाली आहेत. मतदारांनी दुसऱ्यांदा बापूसाहेब पठारे यांनी आमदारकीची संधी दिली आहे.
मतदारसंघाच्या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात होते. मतदारसंघात एकूण ५ लाख ३ हजार ५३९ एवढे मतदार आहेत. यात पुरुष २ लाख ५९ हजार ४५३, महिला २ लाख ४३ हजार ९८४, तर १०२ पारलिंगी मतदार होते. त्यातील एकूण २ लाख ८३ हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये पुरुष १ लाख ४७ हजार ५६८, महिला १ लाख ३५ हजार ४७२, तर १८ पारलिंगी मतदारांनी मतदान केले. एकूण ५६.२१ टक्के मतदान झाले.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली दुपारी २.१५ वाजता मतमोजणीच्या एकूण २३ फेरींची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांनतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बापूसाहेब पठारे यांना विजयी झाले आहेत.
उमेदवारनिहाय मिळालेली मते
राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- बापूसाहेब पठारे – १,३३६८९, राष्ट्र्वादी कॉंग्रेस अजित पवार पक्ष- १२८९७९, वंचित बहुजन आघाडी – विवेक लोंढे – ५४८८, बहुजन समाज पक्ष – हुलगेश चलवादी – ३७६२, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) – चंद्रकांत सावंत – ३१९८, अपक्ष- बापू बबन पठारे- १२६०.