Maharashtra Assembly Election 2024 | Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. दिग्गज नेतेमंडळींनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनीही सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला आहे. खराडी येथील इऑन ग्यानांकुर शाळा या ठिकाणी ते मतदानासाठी पोहचले होते. यावेळी बापूसाहेब पठारे यांनी लोककल्याणासाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही व्यक्त केला. Maharashtra Assembly Election 2024 |
बापूसाहेब पठारे म्हणाले की, “उज्ज्वल व अव्वल महाराष्ट्रासाठी मतदानाचा हक्क, अधिकार, कर्तव्य बजावले आहे. लोकशाहीला सशक्त बनवण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होताना आनंद होतोय. राज्यात यंदा परिवर्तन अटळ असणार आहे आणि लोककल्याणासाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, हा विश्वास आहे. येणारा काळ हा माझ्या वडगावशेरी मतदारसंघासाठी व महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरावा, यासाठी मी प्रयत्नशील असेलच. या आधी म्हणल्याप्रमाणे, ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. लोकशाहीचा अर्थच जनतेने, जनतेच्या हितासाठी, जनते करता चालवलेले राज्य असल्याने जनतेचे राज्य येईल.” Maharashtra Assembly Election 2024 |
हेही वाचा:
‘मी ज्योतिषी नाही, पण मविआला…’ ; शरद पवारांची मतदानानंतरची पहिली प्रतिक्रिया