सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श उभा करणारा ‘बापू’

हवेली तालुक्‍याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असूनदेखील सामान्यातील असामान्य कामगिरी करून आपले वेगळेपण टिकवणाऱ्या आणि तरुणांपुढे एक आदर्श उभा केला आहे. 

आदरणीय शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून नाव असलेले वाघोली येथील माजी उपसरपंच शांताराम (बापू) कटके यांचा आज (शनिवारी) वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा…

हवेली तालुक्‍यात लहान-थोर ज्येष्ठांच्या पाठबळावर आपली वेगळी ओळख निर्माण करून शांताराम (बापू) कटके यांनी राजकारणातील एक समाजकारणाचे नवे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर हवेली तालुक्‍यात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाऊन शरद पवार साहेबांच्या कार्याचे स्मरण करीत समाजकारणाचा वसा घेतला त्यातील एकच शांतारामबापू कटके होय. वाघोली येथील कटकेवाडीतील सर्वसामान्य कुटुंबातील शांतारामबापू कटके कोणताही राजकीय वारसा नसताना वाघोली परिसरातील युवकांना एकत्र करून युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या.

अनेक रोजगार मेळावे आयोजित करून अनेकांना आत्मनिर्भर केले युवकांना स्वावलंबनाचे धडे देत त्यांना समाजकार्याची ओळख करून दिली. मध्यमवर्गीय कुटुंबातील आपल्या अनेक साथीदारांना घेत बापूंनी परिसरातील विकासकामांचा सपाटा सुरू ठेवला त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनासोबत घेऊन जाण्याची पद्धत आणि सर्वांसाठी काम करण्याची पद्धत वाघोलीसह तालुक्‍याला परिचित आहे.

वाघोलीतील आणि तालुक्‍यातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्याच्या हेतूने ग्रामस्थांनी दिलेल्या पाठबळावर उपसरपंच पदाच्या काळात अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करून त्यांनी लोकप्रियता मिळवली. वाघोली जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी चांगल्या मताधिक्‍याने जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देत त्यांच्या पत्नी अर्चनाताई कटके प्रचंड मतांनी निवडून दिले.

जिल्हा परिषदेत अर्चनाताई कटके यांनीदेखील बापूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक शासकीय योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. आपल्या मतदारसंघात शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, विलास लांडे, रमेश थोरात, उमेशदादा पाटील, योगेशभैय्या जगताप, माणिकराव सातव पाटील, राजेंद्रअण्णा सातव-पाटील, तात्यासाहेब काळे, शिवदास उबाळे, कमलाकर सातव-पाटील, बाळासाहेब बापूसाहेब सातव-पाटील आदींची त्यांना मोलाची साथ व मदत झाली आहे. शेतकरी, कामगार, कारखानदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींसाठी अविरतपणे कार्य करणारे बापू युवकांचे आशास्थान आहे.

समाजकारणाचा वसा घेऊन राजकारणात नावलौकिक मिळवून बापूसारखी माणसे अविरतपणे कार्य करताना दिसत आहेत. त्यांच्या अविरत कार्यासाठी त्यांच्यावर नागरिकांच्या आशीर्वादरूपी पाठबळ कायम लाभो. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
“तुम जियो हजारों साल साल के दिन हों पचास हजार…’

बेरोजगारांना दिला मदतीचा हात
अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी बापू नेहमी अग्रभागी असतात वाघोली येथे पतसंस्था स्थापन करून बापूंनी बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करून मोलाची कामगिरी केली आहे. जवळपास 500 ते 600 पेक्षा अधिक गोरगरिबांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून सामाजिक जाणीव ठेवत जाणिवेचा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. शिक्षकांमुळे नवी पिढी घडते या पिढीला ज्या शिक्षकांनी घडवले अशा शिक्षकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी बापूंनी समाजातील उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल गुरू द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवले.

विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसाह्य केले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देऊन अनेक गौरव सोहळ्यांचे आयोजन करून त्या विद्यार्थ्यांना अनेक प्रोत्साहनपर बक्षीस दिली आहेत. वारकऱ्यांसाठी मोफत साहित्य वाटप करून ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा आदर व्यक्‍त केला आहे.

करोनाकाळातील खारीचा वाटा…

वाघोली येथील चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी
गावांत वेळोवेळी हायपोक्‍लोराईची फवारणी
ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी आणि आशा सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अंतर्गत
सर्वेक्षणाचे काम करून रुग्णांना त्वरित उपचार देण्याचे काम
परप्रांतीय मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी मदत
करोनाबाबत मोफत तपासणी
घरातच विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांना अन्नधान्य-पाणीपुरवठा
लहान मुले आणि 60 वर्षांवरील वृद्ध यांची तपासणी
विविध सरकारी कार्यालयांमध्ये सॅनिटायझरचे आणि आर्सेनिक अल्बम-30 औषधाचे वाटप
रुग्णांना गावातल्या गावातच उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेपासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या
नियंत्रण कक्षाची स्थापना
अत्यावश्‍यक सेवा-वस्तूंच्या दुकानांसमोर सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रयत्न करणे
गणेशोत्सव काळात करोना नियमांचे पालन करून केलेली विसर्जन व्यवस्था
गावात जनजागृतीपर पत्रके वाटणे
प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून नागरिकांना सेवा पुरवण्यात आल्या
मजूर व कामागारांना दोनवेळच्या जेवणासाठी ग्रामस्थांच्या मदतीने चालवलेले अन्नछत्र

* शब्दांकन *
दत्तात्रय गायकवाड , हवेली तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.