मुंबई – सोनी टेलिव्हजन वरील प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल’ने आजवरच्या सर्वच सिंगिंग कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले आहे. इंडियन आयडलचे आजवरचे सर्वच सिझन हिट गेले आहेत. यंदाचा सिझन मधील सगळ्याच स्पर्धकांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. यंदाच्या सिझन मध्ये प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी परीक्षकाची भूमिका बजावत होते.
View this post on Instagram
दरम्यान, या विकेण्डला ‘इंडियन आयडल 12’ मध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लहिरी आणि किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार दिसणार आहेत. नुकताच वाहिनीने आगामी भागाचा एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यात बप्पी दा स्पर्धकांना एक विशेष अट घालताना दिसत आहेत.
View this post on Instagram
जो स्पर्धक सर्वोत्कृष्ट गाणं गाईल त्याला ते एक सोनसाखळी भेट म्हणून देणार आहेत. या पूर्वी सुद्धा म्हणजेच ‘इंडियन आयडल 10’ मध्ये बप्पी लहरी यांनी सलमान अली या स्पर्धकाला सोनसाखळी भेट म्हणून दिली होती. तर यंदाच्या सिझन मध्ये पवनदीप राजन याने हा मान पाठवला आहे.
View this post on Instagram
यावेळी पवनदीपने ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ या गाण्यावर परफॉर्म केलं. तसंच त्याने पियानोही वाजवला. पवनदीपची ही प्रतिभा पाहून बप्पी दा त्याचे चाहते झाले. आणि त्यांनी पवनदीपला फक्त सोनसाखळीच भेट म्हणून दिली नाही तर त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफरही दिली.
View this post on Instagram