बाप्पा आतुरता तुझ्या आगमनाची…

गणेशोत्सव दीड महिन्यावर : मरकळ येथील कुंभारवाड्यात साकारली “श्रीं’ची विविध रुपे
मूर्तींची किंमत 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढली 

चिंबळी  – आषाढ महिन्याला सुरुवात झाली असली तरी गणेशभक्‍तांना वेध लागलेय ते गणेशोत्सवाचे! अवघ्या दीड महिन्यावर (दि. 2 सप्टेंबर) आलेल्या गणेशोत्सवासाठी गणरायाची ना ना रूपे साकारण्यास मरकळ (ता. खेड) येथील कुंभारवाड्यात प्रारंभ झाला आहे.
लाडक्‍या गणरायाचे आगमन अवघ्या दीड महिन्यांवर आल्याने गणपती कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्यासह त्यांचे रंगकाम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे यंदा प्लॅस्टिकबंदी असली असली तरी त्याची तीव्रता कमी झाल्याने गणेशमूर्ती झाकण्यासाठी सहजासहजी प्लॅस्टिक उपलब्ध होत आहेत. तसेच जीएसटीमुळे व कच्चा मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदाही मूर्तींची किंमत गेल्या वर्षीपेक्षा 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मरकळ येथील कुंभारवाड्यात 100 रुपयांपासून 50 हजारांपर्यंत “श्रीं’च्या मूर्ती उपलब्ध आहेत.
मरकळ येथील मूर्ती कारागिर शुभांगी कुंभार या गेल्या 20 वर्षांपूर्वी मरकळ येथे सासरी आल्यानंतर त्यांनी “श्रीं’च्या मूर्ती बनवण्यास प्रारंभ केला.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या जवळपास एक हजार गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. यामध्ये अर्धा पासुन ते सात फुटापर्यंतच्या मूर्ती घडवल्या आहेत. यात दत्त अवतार, दगडूशेठ हलवाई, सिंहासन, शंख, बाळूमामा, गरूडावर विराजमान, लालबागचा प्रसिद्ध राजा आदि पद्धतीच्या गणेश मूर्ती घडवल्या आहेत. या मूर्ती घडवण्यासाठी त्यांना सुमारे तीन लाखांचा खर्च आला असून या विक्रितून त्यांणा सर्व खर्च वजा जात अडीच ते तीन लाख रुपये नफा मिळण्याची आशा असल्याचे शुभांगी कुंभार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)