बापमाणूस फेम अभिनेत्री “अभिलाषा पाटील’ यांचे करोनाने निधन

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक कलाकार या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.

अश्यातच मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री ‘अभिलाषा पाटील’ यांचा सुद्धा करोना मुळे मृत्यू झाला आहे. अभिलाषा पाटील यांनी अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले होते. बापमाणूस या मालिकेत त्या पल्लवी पाटीलच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या.

त्यांनी प्रवास या चित्रपटात देखील काम केले होते. तसेच बायको देता का बायको या चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या. काल (दि. ४) दुपारी त्यांचे करोनाने निधन झाले. गेले चार दिवस त्या आयसीयुत होत्या. अभिलाषा पाटी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.