मूकबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची सात दिवसांत चौकशी करणार – गिरीश बापट

मुंबई: पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या  कर्णबधीर व मूकबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल. त्यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.

मूकबधिर आंदोलकांच्या मागण्यांवर सहमती झाल्याने अखेर पुण्यात सुरु असलेलं मूकबधिरांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. राज्य सरकारने सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिलं आहे. तसेच उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर पूर्ण करणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. शासनाच्या वतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला.

गेल्या दोन दिवसांपासून मूकबधिर आंदोलक पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते. आंदोलक तरुणांवर लाठीचार्ज करुन पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. रात्रीपर्यंत आंदोलक उपाशी पोटी बसून होते. या प्रकाराचा सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.