#BANvNZ Semifinal : बांगलादेश संघाने टाॅस जिंकला

पाॅटचेफस्ट्रूम : बांगलादेश-न्यूझीलंड दरम्यान १९ वर्षांखालील वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना आज होत आहे. बांगलादेश- न्यूझीलंड यांच्यातील विजेता संघ विजेतेपदासाठी भारताविरूध्द अंतिम सामना खेळेल.

उपांत्यफेरीच्या या सामन्यात बांगलादेशने टाॅस जिंकला असून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी मात करत उपांत्य फेरी गाठली होती तर न्यूझीलंडने वेस्टइंडिजवर २ विकेटनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली होती.

बांगलादेश संघ : परवेज़ होसैन एमन, तनज़ीद हसन, महमुदुल हसन जॉय, तौहिद हृदय, शहादत होसैन, शमीम होसैन, अकबर अली, रकीबुल हसन, शोरिफ़ुल इस्लाम, तंजीम हसन शाकिब, हसन मुराद

न्यूझीलंड संघ : रियास मारियु, ओली वाईट, फर्गस लेलमैन, जेसी ताश्कऑफ़, क्विन सन्डे, निकोलस लिडस्टोन, बेखम वीलर ग्रीनऑल, आदित्य अशोक, जॉए फील्ड, क्रिस्टियन क्लार्क, डेविड हैनकॉक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.