संघटनेवर बंदी, मात्र खेळाडूंचे वर्चस्व

बॅंकॉक: भारताच्या तिरंदाजी संघटनेवर जागतिक महासंघाने बंदी लावली आहे, मात्र तरीही खेळाडूंनी महासंघाच्या ध्वजाखाली खेळत आपले वर्चस्व राखले आहे. दीपिकाकुमारी, अंकिता भाकत यांच्यासह अनेक खेळाडूंनी याही परिस्थित आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविले आहे.

जागतिक तिरंदाजी महासंघाच्या नियमानुसार निवडणूक न घेतल्याने भारतीय तिरंदाजी संघटनेला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय तिरंदाज या स्पर्धेत जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली खेळत आहेत. मात्र, तरीही खेळाडूंनी अविश्‍वसनिय कामगिरी केली आहे.

महिलांच्या रिकर्व्हमध्ये मलेशियाच्या नूर अफिसा अब्दुल हलिल, इराणच्या झाहरा नेमती, नरिसारा खुन्हिरान्चैयो यांच्यावर विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली तसेच ऑलिम्पिक पात्रता देखील मिळविली. उपांत्य फेरीत दीपिकाने न्गुयेत डू थि अन्हवर विजय मिळवला. अंतिम फेरीत आपलीच सहकारी अंकिता भकतने मात्र दीपिकाची वाटचाल खंडित केली व सुवर्णपदक मिळविले.

आता सांघिक गटात ऑलिम्पिक कोटा मिळविण्याचे लक्ष्य आहे. यासाठी येत्या वर्षात बर्लिनमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आशाच कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे. भारतीय महिला रिकर्व्ह संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी विश्‍वकरंडक स्पर्धेत किमान उपांत्य फेरी गाठावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.