राजगुरुनगर (प्रतिनिधी) : धोकादायक वळणावर लावण्यात आलेल्या पथदर्शक पाट्यांवर युवा नेत्यांने बॅनरबाजी केली असून वाहनचालकांची धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. ‘अन म्हणे बदल हवा’ असा नारा देणाऱ्या या नेत्याने या कृत्याचा महामार्गावर अपघात होण्याची भीती वाढली आहे. राजगुरूनगर शिरूर वाडा या राष्ट्रीय महामार्गावरील धोकेदायक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वळणावर,अपघात ग्रस्त ठिकाणी सावधान पुढे शाळा आहे, सावधान पुढे वळण आहे सावधान पुढे धोका आहे आणि दिशा दर्शक फलकावर एका विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या इच्छुक उमेदवाराने स्वतःचे फलक लावले आहेत. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनकांना पुढे धोका आहे सावधान असे फलक दिसत नसल्याने अपघात होण्याची भीती वाढली आहे. हे फलक तात्काळ हटवण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. निवडणुकीचे वेध लागल्याने त्यांचा वैयक्तिक प्रचार सुरु आहे काहीनी मतदारांना देवदर्शन घडविले, काहींनी खानावळी, जेवणावळी सुरु केल्या तर काहींनी सोशल मीडियावर प्रचार सुरु केला आहे. तर शिंदे गटाच्या एकापदाधिकारी उमेदवाराने चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या रस्त्याच्या कडेच्या फलक झाकून त्यावर आपला प्रचार सुरु केला आहे. शिरूर राजगुरुनगर भीमाशंकर हा राष्ट्रीय मार्ग असून भीमाशंकर कडे जाणाऱ्या पर्यटकांची नागरिकांची भाविक भक्तांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते.
या रस्त्यावर अनेक शाळा, धोकादायक वळणे आहेत अपघात होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशा दर्शक अपघात होऊन नयेत यासाठी सावधानतेचा इशारा देणारे जागोजागी फलक लावले आहेत यामुळे पुढे धोका आहे याची माहिती मिळत. मात्र तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व विधानसभा इच्छुक उमेदवार अक्षय जाधव यांचे फ्लेक्स लावून झाकून टाकले आहेत. धोकादायक फलक असताना त्यांनी जराही विचार न करता त्यावर फ्लेक्स लावले आहेत व ते अलक पूर्णतः झाकून टाकले आहेत.
राजगुरुनगर – भीमाशंकर हा वर्दळीचा महामार्ग आहे यावरून अनेक वाहने जात येत असतात. वेडीवाकडी वळणे, झाडे झुडपे विजेचे खांब रस्त्याच्या कडेला आहेत. ओढे नाले आहेत त्यावर संरक्षक कठडे नाहीत अपघात होऊ नयेत यासाठी अनेक फलक लावले आहेत तरीही अपघात होतच आहेत. आता अपघाताची सूचना देणारी वेगावर नियंत्रण ठेवणारे फलक अक्षय जाधव इच्छुक उमेदवार म्हणून फ्लेक्स लावल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शरद मोटे यांनी सांगितले, महामार्ग रस्त्यावर सार्वजनिक बाधकाम विभागाच्या माध्यमातून लावलेल्या धोकादायक पुढे वळण आहे, वाहने सावकाश चालला आदी फलकावर फ्लेक्स किंवा ते झाकून टाकण्यास मनाई आहे. ते झाकण्याचे कोणीही प्रयत्न करून नयेत वाहन चालकांच्या जीवाशी कोणी खेळू नये. वरिष्ठांच्या चर्चेनंतर कारवाई केली जाईल. फ्लेक्स लावणारे अक्षय जाधव या नेत्याशी संपर्क होऊ शकला नाही