पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधीत असलेल्या व्यक्तिंवर आयकर विभागाने कारवाई केल्यापासून पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीमध्ये संताप दिसून आला असून अजित पवार यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.
असे असताना भाजप नेते किरीट सोमय्यांकडून वारंवार आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामध्ये अजित पवारांच्या हातात तलवार असलेले बॅनर नगरसेवक युवराज बेलदरे यांनी लावले आहेत. या बॅनरवर ‘जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये’ समझने वालों को इशारा काफी है,” असा मजकूर लिहण्यात आला आहे. दरम्यान या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे.