Mizoram : मिझोराममध्ये 17 कोटींची बंदी असलेली औषधे जप्त

मामित (मिझोराम),- मिझोरामच्या मामित जिल्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून 17 कोटी रुपयांच्या प्रतिबंधित ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 36 वर्षीय मोहम्मद इद्रेश मिया आणि 28 वर्षीय खुगोन दास अशी आरोपींची नावे आहेत.
मिझोराम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “गोपनीय माहितीच्या आधारे, 23 जूनच्या रात्री महामार्ग जंक्शनवर कर्तव्यावर असलेल्या मामित पोलिसांनी एमडी इद्रिश मिया चालवित असलेल्या कारला अडवले.
झडतीदरम्यान, पोलीस पथकाने वाहनाच्या खाली एका डब्यात लपवून ठेवलेले 3.47 किलो हेरॉईन असलेले 270 बॉक्स जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 17 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. दोन आरोपी – एमडी इद्रिश मिया (36 वर्षे) आणि खुगोन दास (28 वर्षे) त्रिपुरा यांना मामित पोलिस ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.”
पोलिसांनी कलम 1(सी), 25, 29 एनडी आणि पीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.





