Bank Holiday In August | काही दिवसांमध्ये आता ऑगस्ट महिना सुरू होईल. त्यानुसार अनेकांना बँकेसंदर्भात महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतात. जर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर त्यापूर्वी पुढील महिन्यात (ऑगस्ट) नेमकी कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहेत, ते जाणून घ्या.
ऑगस्ट महिन्यात एकूण 14 सुट्ट्या आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांचा अंदाज घेऊनच तुम्ही बँकेच्या कामाचे नियोजन करा. आरबीआयकडून प्रत्येक महिन्याला सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. याच यादीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि भारतीय स्वातंत्र्यदिनी संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल. यासह ऑगस्ट महिन्यात एकूण चार रविवार आणि दोन शनिवार आहेत. या दिवशीही संपूर्ण देशातील बँका बंद असतील. यासह वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक सणांनुसार एकुण 14 दिवस बॅंकांना सुट्टी आहे. Bank Holiday In August |
ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी
3 ऑगस्ट- केर पूजा- अगरतळामध्ये बँकांना सुट्टी
4 ऑगस्ट- रविवार
7 ऑगस्ट- हरियाली तीज – हरियाणातील बँकांना सुट्टी
8 ऑगस्ट- तेंदोंग लो रम फॅट – गंगटोकमध्ये बँकांना सुट्टी
10 ऑगस्ट- दुसरा शनिवार
11 ऑगस्ट- रविवार
13 ऑगस्ट- पेट्रियॉट डे – इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी
15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिन
18 ऑगस्ट- रविवार
19 ऑगस्ट- रक्षाबंधन
20 ऑगस्ट- श्री नारायण गुरु जयंती – कोची आणि तिरुअनंतपूरम मधील बँकांना सुट्टी
24 ऑगस्ट- चौथा शनिवार
25 ऑगस्ट- रविवार
26 ऑगस्ट- जन्माष्टमी. Bank Holiday In August |
हेही वाचा:
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीपूर्वी संसदेत चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक ; अखिलेश-मायावतींमधील तणाव वाढणार