Bank Holiday In March : फेब्रुवारी महिना संपत असून आता मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या दिवशी रविवार आला आहे. या महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेत जाणार असाल तर ही बातमी वाचा… याचे कारण म्हणजे होळी, धुलिवंदन, गुढीपाढवा, रमजान ईद, राम नवमी असे सण या महिन्यात आहेत. त्यामुळे या सणांदिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार बंद असतील. याशिवाय विविध सरकार अस्थापनांचे कामकाज देखील बंद असणार आहे. ‘या’ दिवशी असणार सुट्टी मार्च महिन्यात 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेला मिळून एकूण 5 रविवार येत आहेत. त्यामुळे या तारखांना बँकांना सुट्टी असेल. त्याबरोबरच 14 आणि 28 मार्च या दिवशी दुसरा आणि चौथा शनिवार आल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. 3 मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये धुलिवंदनानिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे, तर 19 मार्च रोजी गुढीपाडव्याला बँकांचे कामकाज बंद राहील. 21 मार्च रोजी रमजान ईदनिमित्त बँका बंद राहतील. 26 मार्च रोजी बँकांना रामनवमीची सुट्टी राहणार आहे. हेही वाचा : Top 10 News : पैशांनी भरलेलं विमान कोसळलं ते सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याला ब्रेक? जाणून घ्या आजच्या Top 10 News