या महिन्यात १० दिवस बँका बंद असतील

मुंबई – सर्वसामान्यांच्या जीवनातील आणि दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सगळ्यांचाच बँकेशी संबंध येत असतो. त्यामुळे एखाद्या वेळेस बँक बंद असेल तर त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागतो. त्यामुळे तुमची बँकेची कामे असतील तर ती लवकर उरकून घ्या. कारण या महिन्यात बँका दहा दिवस बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात बँकांना मोठी सुट्टी असते, मात्र यावेळी बँकांना सलग सुट्टी नसली तरी १० दिवस बँका बंद असणार आहेत.

  • महिन्याच्या सुरवातीला पहिल्या शनिवारी ६ तारखेला गुडी पाडवा असल्याने बँकेला सुट्टी असेल.
  • त्यानंतर प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजे १३ आणि २७ तारखेला बँक बंद असेल.
  • बुधवार १७ तारखेला महावीर जयंती आणि शुक्रवार १९ तारखेला गुड फ्रायडे असल्याने बँक असतील.
  • आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्टी ७, १४, २१ आणि २८ या तारखांना बँक बंद असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.