नवी दिल्ली – नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत, मात्र नवीन वर्षात तुमचे बँकांशी अधिक व्यवहार होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या जानेवारीतील बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार जानेवारी २०२२ मध्ये देशभरातील सर्व बँका १६ दिवस बंद राहणार आहेत. साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त, इतर अनेक सुट्ट्यांमुळे जानेवारीमध्ये विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
माहितीनुसार, विविध राज्यांतील बँकांना अनेक उत्सव आणि कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या असतील. लोसांगच्या निमित्ताने गंगटोकमधील सर्व बँका बंद आहेत. त्याचबरोबर इतर राज्यांच्या बँका सुरू राहतील. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त फक्त कोलकातामधील बँकांना सुट्टी लागू आहे. आरबीआयने प्रादेशिक सुट्ट्या आणि कॅलेंडरवर आधारित बँकांसाठी विविध सुट्ट्या ठेवल्या आहेत. मात्र, बँकांच्या सुटीच्या काळातही ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील.
जानेवारी २०२२ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी देण्यात आली आहे. ज्यामध्ये राज्यवार आणि साप्ताहिक सुट्ट्यांची माहिती दिली गेली आहे.
जानेवारी २०२२ मध्ये राज्यनिहाय बँक सुट्ट्या
१ जानेवारी २०२२: नवीन वर्षा निमित्त (देशव्यापी सुट्टी)
३ जानेवारी २०२२: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन/लोसुंग (सिक्कीम)
४ जानेवारी २०२२: लोसुंग (मिझोरम)
११ जानेवारी २०२२: मिशनरी दिवस
१२ जानेवारी २०२२: स्वामी विवेकानंद जयंती
१४ जानेवारी २०२२: मकर संक्रांती (अनेक राज्ये)
१५ जानेवारी २०२२: पोंगल (आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तामिळनाडू)
१८ जानेवारी २०२२: थाई पूसम (चेन्नई)
२६ जानेवारी २०२२: प्रजासत्ताक दिन (देशभर)
३१ जानेवारी: मी-डॅम-मी-फी (आसाम)
जानेवारी २०२२ मध्ये बँकांना साप्ताहिक सुट्टी
२ जानेवारी २०२२: रविवार
८ जानेवारी २०२२: दुसरा शनिवार
९ जानेवारी २०२२: रविवार
१६ जानेवारी २०२२: रविवार
२२ जानेवारी २०२२: चौथा शनिवार
२३ जानेवारी २०२२: रविवार
३० जानेवारी २०२२: रविवार