लंडन : बँकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याने सर्व कर्जाची रक्कम परत करणार असल्याचे म्हटले आहे. त्याने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. दरम्यान, आपल्याला बँक आणि सक्त वसुली संचलनालयाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्याने ट्विट करून सांगितले आहे.
“केंद्र सरकारने संपूर्ण भारतात लॉकडाउन केले आहे. याचा कोणीही विचारदेखील केला नव्हता. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. यामुळे माझ्या सर्व कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. सर्व प्रकारचे उत्पादनही बंद आहे. याव्यतरिक्त आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवत नाही आणि त्यांना त्यांचा मोबदलाही देण्यात येत आहे. सरकारला आमची मदत करायला हवी,” अशा आशयाचे ट्विट मल्ल्या याने केले आहे.
Indian Government has done what was unthinkable in locking down the entire Country. We respect that. All my Companies have effectively ceased operations. All manufacturing is closed as well. Yet we are not sending employees home and paying the idle cost. Government has to help.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 31, 2020
I have made repeated offers to pay 100 % of the amount borrowed by KFA to the Banks. Neither are Banks willing to take money and neither is the ED willing to release their attachments which they did at the behest of the Banks. I wish the FM would listen in this time of crisis.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 31, 2020
मी अनेकदा बँकांचे सर्व पैसे देण्याची ऑफर दिली आहे. परंतु बँक किंना सक्तवसूली संचलनालय मदतीसाठी तयार नाही. या संकटाच्या काळात अर्थमंत्रालय आपली म्हणणं ऐकेल,” असा विश्वासही त्यानं दुसऱ्या ट्विटमधून व्यक्त केला आहे. यापूर्वीही त्यानं ट्विट करून बँकांचे पैसे परत करणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु तो स्वत: भारतात परतण्यास तयार नाही आणि गेल्या चार वर्षांपासून तो लंडनमध्ये आहे.