नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने मुबलक भांडवल सुलभतेचे पतधोरण जाहीर केल्यानंतर बॅंकांकडून व्याजदर कपात चालूच आहे. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बॅंक ऑफ इंडियाने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेसड् व्याजदरात (एमसीएलआर) 0.15 टक्क्यांनी कपात केली आहे.
ही दरकपात 11 ऑगस्टपासून अंमलात आली आहे. एक वर्षासाठीचा एमसीएलआर 7.40 टक्क्यांवरून 7.25 टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर 6.95 टक्के तर सहा महिन्यांचा एमसीएलआर 7.10 टक्के करण्यात आला आहे.
जुलै 2019 पासून बॅंकेने केलेले ही चौदावी व्याजदर कपात आहे. याअगोदरच महाराष्ट्र बॅंक आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेने आपल्या व्याजदरात कपात केली आहे.