बॅंका, ग्राहक वस्तू क्षेत्रात तेजीत; सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ

मुंबई – जागतिक पातळीवर वातावरण अस्थिर असुनही शुक्रवारी गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची निवडक खरेदी केल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक वाढण्यास मदत झाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 138 अंकांनी वाढून 52,975 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 32 अंकांनी म्हणजे 0.20 टक्‍क्‍यांनी वाढून 15,856 का वर बंद झाला.

सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 164 अंकांनी तर निफ्टी 67 अंकांनी कमी झाला. मुख्य शेअर बाजार निर्देशांक वाढले असले तरी फक्त निवडक कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली आणि इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले.

एमके मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे जोसेफ थॉमस यांनी सांगितले की गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात आगेकूच करीत असले तरी बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर करोना कसे रूप धारण करतो याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे.

सध्या जे गुंतवणूकदार जोखीम घेऊ इच्छित आहेत ते खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. रिझर्व्ह बॅंका आगामी काळामध्ये भांडवल सुलभता वाढवितील की नाही याबाबत गुंतवणूकदारांना शंका आहे.

मुख्य निर्देशांकात थोडीफार वाढ झाली असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप मात्र कालच्या पातळीवर स्थिर राहिले. करोनामुळे जागतिक बाजारातूनही संमिश्र संकेत येत आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.

रुपया आज 6 पैशांनी वाढून 74.40 रुपये न्रती डॉलर झाला. क्रुड 0.01 टक्‍क्‍यानी कमी होऊन 73.78 डॉलर प्रती पिंप झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.