नवी दिल्ली – केंद्र सरकार या वर्षी किमान दोन सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी बॅंकिंग कायद्यात काही सुधारणा आवश्यक आहे. या सदर्भातील विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केली जाण्याची शक्यता आहे.
बॅंकिंग कंपनी कायदा 1970 आणि बॅंकिंग कंपनी कायदा 1980 या दोन कायद्यामध्ये यासाठी दुरुस्त्या करणे आवश्यक आहे असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या दोन कायद्यामुळे खासगी बॅंकांचे सरकारीकरण झाले होते. त्यामुळे सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्यासाठी या दोन कायद्यात दुरुस्त्या आवश्यक आहेत