भरदिवसा कोल्हापुरात बँक लुटली ; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

कोल्हापूर – शस्त्रांचा धाक दाखवून भरदिवसा बँक लुटण्याचा प्रकार गुरुवारी कोल्हापुरात घडलाय. अपटेनगर इथल्या यशवंत सहकारी बँकेत घुसलेल्या दोघा चोरट्यानी बंदुकीचा धाक दाखवून बँकेतील 62 हजाराची रोखड लंपास केलीय.दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा मग काढण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यांना अपयश आले.दरम्यान याच बँकेच्या कळे शाखेत दोन महिन्यांपूर्वी दरोडा टाकून कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला होता तर बाजाराभोगाव इथल्या शाखेमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता त्यामुळे चोरट्यांचा टार्गेटवर वारंवार हीच बँक का याचे गौडबंगालाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.