नवी दिल्ली – बॅंक ऑफ महाराष्टाने शेअर बाजारांना सादर केलेल्या माहितीनुसार बॅंकेचा डिसेंबर 2021 अखेर कर्जपुरवठा 23 टक्क्यांनी वाढून 1.29 लाख कोटी रुपये झाला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस बॅंकेचा कर्जपुरवठा 1.04 लाख कोटी रुपये इतका होता.
यावर्षी डिसेंबरअखेर बॅंकेतील ठेवी 15 टक्क्यांनी वाढून 1.86 लाख कोटी रुपये इतक्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत बॅंकेच्या ठेवी 1.61 लाख कोटी रुपये इतक्या होत्या.
डिसेंबरअखेर बॅंकेची एकूण उलाढाल 18 टक्क्यांनी वाढून 3.15 लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 2.66 लाख कोटी रुपये होती. बॅंकेच्या करंट आणि सेविंग अकाउंट मधील डिपॉझिटची रक्कम वाढत असून एकूण ठेवीच्या तुलनेत या ठेवीचे प्रमाण 55 टक्क्यावर गेले आहे.
बॅंकेची गुंतवणूकही वाढली असून डिसेंबरअखेर बॅंकेने गुंतवणूक केलेली रक्कम 72,328 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 64,638 कोटी रुपये इतकी होती.