पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी वित्तीय समावेशन व कर्ज सुविधा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, मावळ तालुका, मुळशी तालुका, खेळ तालुका, आंबेगाव तालुका व जुन्नर तालुका व्यापित असलेलेया या विभागातील सर्व 61 शाखांनी या कार्यक्रमात भाग घेतला. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए बी विजय कुमार यांनी अभियानाचे नेतृत्व केले.
बॅंकेच्या रिटेल कर्ज विभागाचे उपसरव्यवस्थापक जतीन देसाई, पुणे पश्चिम विभागीय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक राहुल वाघमारे पुणे आणि उप विभागीय व्यवस्थापक अमित गोयल, पुणे जिल्ह्याचे अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान व महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधान मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विकास, पंतप्रधान जनधन योजना, पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, अटल निवृत्तीवेतन योजना, स्टैंडअप इंडिया, विविध बचत गट योजना अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थ्यांना वित्तीय सहाय्य कार्यक्रमात मंजूर करण्यात आली.