पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 16 सप्टेंबर रोजी आपला 87 वा वर्धापनदिन पुणे येथील मुख्यालयात दृकश्राव्य माध्यमातून साजरा करण्यात आला. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक एस राजीव यांनी बॅंकेचे ग्राहक व भागधारकांना शुभेच्छा दिल्या.
बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टमटा यांनी सर्व कर्मचारी वर्ग, ग्राहक, भागधारक यांनी मिळून पूर्ण क्षमतेने व समर्पित भावाने काम केल्यामुळेच बॅंकेने हा मैलाचा दगड गाठला असल्याचे नमूद केले. बॅंकेचे संचालक ए बी विजय कुमार यांनी बॅंकेच्या सरव्यवस्थापाकांच्या उपस्थित बॅंकेच्या संस्थापकांना पुष्पांजली अर्पण केली.
विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली तंदुरुस्त भारत दौड 2.0 आयोजित करण्यात आली. पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी असलेल्या 87 फिरत्या विक्रेत्यांचा विजय कुमार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष बालकांसाठी कार्यरत असलेल्या पिरंगुट स्थित संस्कार प्रतिष्ठान संस्थेस बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे योगदान देऊन सहाय्य केले. विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली नवी पेठेतील डेव्हिड ससून निवारा वृद्धाश्रमाला साहाय्य करून आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचा अल्प प्रयत्न केला.
बॅंकेच्या विधी व वसुली विभागाचे सरव्यवस्थापक पी आर खटावकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर निरीक्षण विभागाचे सरव्यवस्थापक व्ही डी कोल्हटकर यांनी आभार प्रदर्शन केले .