पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कोलकाता विभागात नव्या सहा शाखा सुरू करण्यात आल्या असून त्यातील एक शाखा अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेयर येथे असून उर्वरित पाच शाखा या पश्चिम बंगाल मधील जलपायगुडी, कूच बिहार, रायगंज, झारग्राम, व कृष्णनगर येथे सुरु करण्यात आल्या आहेत. या शाखा सुरु झाल्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या संपूर्ण देशात 1949 बॅंकिंग व्यवसाय शाखा झाल्या आहेत.
बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव, कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, ए बी विजयकुमार, सरव्यवस्थापक व्ही डी कोल्हटकर व यु आर राव हे बॅंकेच्या मुख्य कार्यालयातून कॉन्फरन्सींद्वारे समारंभात सहभागी झाले होते.