नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने दुसर्या तिमाहीचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत बँकेचा नफा 63 टक्क्यांनी वाढून 2,374 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित बँकेला केवळ 1,458 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. बँकेचे व्याजातील उत्पन्न चार टक्क्यांनी वाढून 5,986 कोटी रुपये झाले आहे.
गेल्या वर्षी ही रक्कम 5,740 कोटी रुपये होती. बँकेची अनुत्पादक मालमत्ता रकमेत 29 टक्क्यांनी कमी होऊन 1,978 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी अनुत्पादक मालमत्ता 5,649 कोटी रुपये होती. त्यामुळे खराब कर्जापोटी बँकेला कमी तरतूद करावी लागली. अशा परिस्थितीत नफा वाढण्यास मदत झाली आहे.