नवी दिल्ली – जर तुम्ही बॅंक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. या बॅंकेने आपल्या ग्राहकांना २१ एप्रिल २०२१ च्या अगोदर Card Shield Application ला अपडेट करण्याची विनंती केली आहे. जर ग्राहकांनी असे केले नाही, तर दुसऱ्या दिवशी २२ एप्रिल पासून हे कार्ड काम करणार नाही. बॅंक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली.
Notice for Termination of Card Shield Application for Debit card!
Link to download BOI Mobile Banking app below:
Playstore: https://t.co/37lBFQ6d2i
Appstore: https://t.co/GPQaMr38Hx pic.twitter.com/X0ucNlqbZU— Bank of India (@BankofIndia_IN) March 19, 2021
जाणून घ्या बॅंकेने काय सांगितले
बॅंकेच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्डवर मॉनिटरिंग आणि कंट्रोलची सुविधा मिळते. बॅंकेने आता या सर्विसला BOI मोबाईल अॅप आणि इंटरनेट सोबत इंटिग्रेट केले आहे. यासाठी ग्राहकांनी आता बॅंकेचे मोबाईल अॅप वापरणे गरजेचे आहे. बॅंक ऑफ इंडियाने ट्विट करताना लिहले, डेबिट कार्डसाठी कार्ड शिल्ड अर्ज संपुष्टात आणण्याच्या सूचना! खालील बीओआय मोबाइल बँकिंग अॅप डाउनलोड करण्यासाठी दुवा-
प्लेस्टोर: http://bit.ly/BO
Appstore: http://bit.ly/BOIMB
BOI च्या कार्ड शिल्डचा फायदा –
कार्ड शिल्डच्या माध्यमातून ग्राहक आपल्या कार्डावर पूर्णपणे कंट्रोल ठेऊ शकतात. यामुळे ग्राहकांना समजते की, त्यांना डेबिट कार्डचा कधी, कोठे, कसा आणि केव्हा वापर करायचा आहे. कदाचित कोणत्या ग्राहकाचे कार्ड मिसप्लेस झाले, तर बॅंकेच्या या अॅपच्या मदतीने कार्ड ऑफ करता येऊ शकते. ऑनलाईन व्यवहार झाल्यास ग्राहकांना नोटिफेशन मिळेल. या कार्डाची मर्यादा ही निश्चित केली जाऊ शकते. कार्ड शिल्ड नुसार Transactions Near You ची सुविधा मिळते.