बडोदा बॅंकेची ‘व्हॉट्‌सऍप बॅंकिंग’ सुविधा सुरू; ‘ही’ कामं होणार एका क्लिकवर

मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बडोदा बॅंकेने व्हॉट्‌स ऍप या मेसेजिंग ऍपवर बॅंक सेवा सुरू केली आहे. व्हॉट्‌स ऍपवर बॅंकेद्वारे उर्वरित रकमेची चौकशी, मिनी स्टेटमेंट, धनादेशाच्या अद्यावत स्थितीविषयी चौकशी, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, बॅंकेची उत्पादने व सेवांची माहिती, डिजिटल उत्पादनांसाठी नोंदणी/अर्ज इत्यादी सेवा दिल्या जाणार आहेत.

यामुळे ग्राहकांना घरीच राहून सेवा वापरता येईल. या सेवेशी संबंधित महत्त्वाच्या फायद्यांमधे बॅंकिंग सेवांची अहोरात्र उपलब्ध, अर्ज डाउनलोड करण्याची अतिरिक्त गरज नसणे, कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आयफोन आणि अँड्रॉइडवर उपलब्धता इत्यादींचा समावेश आहे.

बॅंकेचे ग्राहक नसलेल्यांनाही या प्लॅटफॉर्मचा वापर करून बॅंकेची उत्पादने, सेवा, ऑफर्स, एटीएम आणि शाखांची ठिकाणे याविषयी विचारता येणार आहे. बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. के. खुराना म्हणाले की, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या आणि नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो. या सेवाचा लाभ कसा घ्यावा याचा तपशील बॅंकेच्या वेबसाईटवर उलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.