महाराष्ट्र बॅंकेला सुधारणांसाठी पुरस्कार

पुणे – भारत सरकारतर्फे दिला जाणारा ईएएसई (ईझ) अर्थात एन्हांस्ड ऍक्‍सेस अँड सर्व्हिस एक्‍सलन्स बॅंकिंग सुधारणा पुरस्कार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्रला दिला गेला. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव तसेच कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांनी शीर्ष सुधारक गटातील प्रथम उपविजेता पुरस्कार दिल्लीत स्वीकारला.

ईझ हा भारत सरकारचा उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या सुधारणेबाबत भारतीय बॅंक्‍स संघटनेच्या (आयबीए) माध्यमातून राबविला गेला आहे. बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप (बीसीजी) ही संस्था आयबीएने या कामासाठी नियुक्त केली गेली होती. तिच्या माध्यमातून सहा विषयांतर्गत येणाऱ्या 140 उद्देशांच्याद्वारे सरकारी मालकीच्या बॅंकांच्या कामगिरीबाबत अभ्यास बीसीजीद्वारे केला गेला. बॅंक ऑफ महाराष्ट्राने या सहाही विषयांतर्गत सुधारणेमध्ये प्रशंसनीय कामगिरी केली आहे. राजीव म्हणाले की, एक जबाबदार आणि स्वच्छ बॅंकिंग सेवा देण्यासाठी तसेच ईझ हा विषय पुढे नेण्यासाठी बॅंक प्रयत्न करेल.

जून 2017 पासून बॅंक ऑफ महाराष्ट्रने विविध संरचनात्मक बदल अवलंबिल्याने कार्यक्षमता, मालमत्तेची गुणवत्ता आणि ताळेबंद यामध्ये सुधारणा झाली आहे. बॅंकेच्या टर्न-अराऊंड धोरणामुळे प्रभावी मूल्य- व्यवस्थापन आणि पद्धती आणि एकाच भागातील शाखांच्या सुसूत्रीकरणामुळे वृद्धीला चालना मिळाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)