काही दिवसांनी ऑक्टोबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात 15 दिवस बँक बंद राहणार आहे. या महिन्यात दिवाळी, दसरा, दुर्गापूजा यासारखे सण असल्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत कोणते महत्वाचे काम असेल तर आतापासूनच त्याचे नियोजन करा.
कोणत्या दिवशी बँका राहणार बंद?
2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.
3 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीला सुरुवात. तसेच महाराजा अग्रसेन जयंती देखील असेल. अशा परिस्थितीत मध्यप्रदेशसह देशभरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि बँका बंद राहणार आहेत.
6 ऑक्टोबर 2024 रविवार आहे.
10 ऑक्टोबर 2024 रोजी महा सप्तमी आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी आहे.
11 ऑक्टोबर 2024 रोजी महानवमीनिमित्त मध्य प्रदेश तसेच देशभरात सुट्टी असेल.
12 ऑक्टोबर 2024 हा दसरा आहे. विजयादशमीनिमित्त सर्व सरकारी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.
13 ऑक्टोबर 2024 रविवार आहे.
17 ऑक्टोबर 2024 रोजी महर्षी वाल्मिकी, कांति बिहूनिमित्त देशातील अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
20 ऑक्टोबर 2024 रविवार आहे.
26 ऑक्टोबर 2024 रोजी. बँकांना सुट्टी असेल.
27 ऑक्टोबर 2024 रविवार आहे.
29 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी अंतर्गत ऐच्छिक सुट्टी असेल.
30 ऑक्टोबर 2024 रोजी ऐच्छिक सुट्टी असेल.
31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी आणि दिवाळीला सुट्टी असेल.
बँकेच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्ही डिजिटल बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम करू शकता. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम वापरू शकता. तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर सुट्टीचे दिवस सोडून इतर दिवशी तुम्ही बँकांमध्ये जाऊन तुमचे काम पूर्ण करू शकता.