पुणे – ऑगस्ट महिन्यात बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. यामुळे लवकरात लवकर आपली बँकेची कामे उरकून घ्यावीत.देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे पाच दिवस बंद राहणार आहेत.
बँक सुट्टी एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होत नाही. सर्व ठिकाणी एकाच वेळी फक्त काही सुट्या असतात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद असतात.
मोहरमच्या निमित्ताने नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ आणि इतर अनेक राज्यांमध्ये 19 ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात बँकांमध्ये 15 दिवसांच्या सुट्या आहेत.
याशिवाय पहिली ओणम साजरी करण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका 20 ऑगस्टला बंद राहतील. तिरुवनंतपुरम आणि कोचीसाठी 21 ऑगस्टला तिरुवोनमसाठी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
या दिवशी बँका राहणार बंद
19 ऑगस्ट 2021 – मोहरम (आशुरा)
20 ऑगस्ट 2021 – मोहरम / पहिला ओणम
21 ऑगस्ट 2021 – तिरुवोनम
22 ऑगस्ट 2021 – देशभरातील सर्व बँका रविवारमुळे बंद राहतील.
23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती
28 ऑगस्ट, 2021 – चौथा शनिवार
29 ऑगस्ट 2021 – रविवारमुळे सर्व बँका बंद राहतील.
30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी
31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण अष्टमी